खुशखबर ! गणेशोत्सवापूर्वी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजेनचा लाभ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’अंतर्गत जाहीर केली. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील १०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी करून तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार आहे.

सध्या राज्यातील कोकण व नागपूर विभाग वगळता उर्वरित २० ते २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते ११ सप्टेंबर या काळात त्या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ६० टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता त्यांना पीकविमा संरक्षित रकमेतील २५ टक्के मिळणार आहे. त्यासाठी सरकारला विमा कंपन्यांना १५५१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांसमोरील संकट कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची तयारी सुरु केली आहे.

ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा १४वा हप्ता मिळाला, त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारला एक हजार ७१२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, मालमत्तेची एकत्रित नोंद देखील केलेली नाही अशांची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचनाद्वारे योजनेतून वगळले जाणार आहे. ‘नमो महासन्मान’ योजनेमध्ये एकूण ८९.८७ लाख अर्जदार शेतकरी आहेत.  तर ८५.६० लाख शेतकऱ्यांना योजेनचा लाभ मिळणार आहे. तर ८०.१५ लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.