ट्रॅक्टर, कार, एसटीचा भीषण अपघात; ६ जण जागीच ठार, अनेक जखमी

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघाताची घटना कल्याण-नगर महामार्गावर घडली.  या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वाहने अक्षरश: चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला. अपघात इतका भीषण  होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.