राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण पॅनलचा धुवा

0

19 पैकी 17 जागा जिंकून खा. उमेश पाटील पॅनलने मारली बाजी

लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव ; राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास पॅनलचे 19 पैकी अवघे दोन उमेदवार विजयी झाले, तर खासदार उमेश पाटील यांच्या यांना चव्हाण स्मृती पॅनलचे 19 पैकी 17 उमेदवार विजयी झाले. आमदार विरुद्ध खासदार यांच्या मध्ये झालेल्या लढाईत खासदार उमेश पाटलांनी बाजी मारली.

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव ही एक मोठी नावाजलेली शिक्षण संस्था असून तालुक्यातील सुमारे 40 शाखा आणि एकूण 1150 कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण 19 जागांसाठी झालेल्या या पंचवार्षिक निवडणुकीत तीन पॅनल रिंगणात होते. तरी खरा सामना हा आमदार मंगेश चव्हाण पुरस्कृत विकास पॅनल आणि खासदार उमेश पाटील पुरस्कृत यांना चव्हाण स्मृती पॅनल मध्ये होता.

तिसरे परिवर्तन पॅनलचे फक्त 11 जागा लढवल्या होते. आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उमेश पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपाने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यात मंगेश चव्हाण यांना पराजयाचा फटका बसला.

सर्वसाधारण जागांचा निकाल

स्व.य.ना. चव्हाण स्मृती पॅनलचे विजयी उमेदवार : डाॅ.विनायकराव चव्हाण १५६६, भैय्यासाहेब पाटील १४८४, बाळासाहेब चव्हाण १३३५, धनंजय चव्हाण १३६४, अविनाश देशमुख १३०३, प्रमोद पाटील १४५२, बारिकराव वाघ १०२७, सुनिल देशमुख १११२, अॕड.साहेबराव पाटील ११७९, हंसराज पाटील १०६३, रावसाहेब साळुंखे १०९२, शेनपडू पाटील १०४०

विकास पॅनलचे विजयी उमेदवार :

अरुण निकम १०४७, विकास पाटील १०४२

Leave A Reply

Your email address will not be published.