दारुड्या पतीचा सतत त्रास ,पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोल्हापूर  

 

गडहिंग्लज : येथी रोज दारूच्या नशेत सतत त्रास देणाऱ्या पतीच्या डोक्यात पत्नीने रागाच्या भरात दगड घातला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. शितल गजानन गाडवी (वय ४९, रा. भडगाव ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी गायत्री हिला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी, मूळचे गडहिंग्लजचे रहिवाशी असलेले गाडवी कुटुंबिय  गेल्या काही वर्षांपासून भडगाव येथे राहतात. त्यांना विवाहित मुलगी,मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी शीतलला अर्धांगवायू झाला असून त्याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे दोघांत सतत भांडणे होत.

घरालगतच्या पाठीमागील बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, काल बुधवारी (दि.१९) दोघांत भांडण झाले. संंध्याकाळी साडेसातच्या सुमारास शेडमधील कॉटवर झोपून तो गायत्रीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला.

दगडाचा घाव वर्मी बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस पाटील उदय पुजारी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके अधिक तपास करीत आहेत. चोरीला

Leave A Reply

Your email address will not be published.