मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑक्टोबर हिटसोबत मुंबईत प्रदूषण वेळेपूर्वीच कहर करत आहे. या सगळ्यांच थंडी कुठे तरी लांब गेल्याच दिसत आहे. सामन्यात दिल्ली प्रदूषणामुळे चर्चेत राहते पण मुंबईची स्थिती आणखी त्यापेक्षाही वाईट झाली आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीचा विक्रम मोडला आहे. तीन दिवसांपासून मुंबईची हवा दिल्लीपेक्षा विषारी आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे मंत्री सांगतात की. सध्या सुरु असलेले प्रकल्प त्याला जबाबदार आहेत. रस्त्यापासून आकाशाकडे प्रदूषण वाढत आहे. मुंबईत पॅरा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, गुरुवारी सकाळी मुंबईत AQI पातळी १६६ नोंदवली आहे. तर दिल्लीत ती ११७ होती. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या हवेतील PM१० पातळी १४३ होते, तर दिल्लीत
दिल्लीच्या तुलनेत मुंबईची हवा खराब
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, गुरुवारी सकाळी मुंबईत AQI पातळी १६६ नोंदवली गेली, तर दिल्लीत १७७ होती. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या हवेतील PM१० पातळी १४३ होता, तर दिल्लीत १२२ होता. मुंबईचा AQI मंगळवारी १३३ होता. तर दिल्लीचा AQI ८३ आहे. बुधवारी धुक्यामुळे मुंबई उपनगरीय नेटवर्कच्या मुख्य मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
काय म्हणाले आयएमडी?
आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की, यंदा पाऊस लवकर संपणे, माती पूर्णपणे कोरडी होणे, प्रकल्पांमधून उडणारी धूळ आणि वाढती वाहतूक ही विषारी हवेची प्रमुख करणे आहे. ते म्हणाले की, १० ऑक्टोबरालच पाऊस माघारला, जमिनीची माती पूर्णपणेकोरडी झाली आहे, सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये उडणारी धूळ आणि वाढलेली वाहतूक हे सर्व मोठे घटक आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्येही असे घडले आहे की AQI खराब श्रेणीत गेला आहे.