मुंबईच्या शिवसेना भवनाजवळ टॅक्सीने घेतला पेट !

0

मुंबई / लोकशाही न्यूज नेटवर्क

अतिशय वर्दळीच्या मुंबईच्या शिवसेना भावनाजवळ एका वॅगनआर टॅक्सी कारला अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खलबल उडाली . दरम्यान घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या सेनाभवनासमोर एक प्रवासी चारचाकी वाहन उभे असताना, त्या वाहनाने अचानक पेट घेतला. थोड्या वेळातच या आगीने भीषण रूप धारण करत, संपूर्ण कार आगीच्या तावडीत आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी सतर्कता ठेऊन वाहतूक थांबवत दुकाने बंद केली.

Leave A Reply

Your email address will not be published.