मुक्ताईनगर येथील आगेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना 51 हजाराची मदत

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील काही दुकानांना मध्यरात्री भीषण स्वरूपाची आग लागली होती. त्या आगीत व्यापाऱ्यांचा पूर्ण माल जळून अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांवर घडलेल्या दुःखद प्रसंगातून त्यांना सावरण्यासाठी मुक्ताईनगर येथील व्यापाऱ्यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत मुक्ताईनगर येथील व्यापारी बांधवांनी 51 हजार रुपयांची मदत जमा केली. आणि ती रक्कम सर्व व्यापाऱ्यांनी मिळुन एन.आर.बुट हाऊस चे मालक व जगदंबा गोळी बिस्कीट चे मालक या दोघेही व्यापाऱ्यांना ही मदत सुपूर्द केली. यावेळी मिळालेल्या मदतीमुळे व्यापारी भारावून गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.