ATM मधील कॅशचा गैरव्यवहार, आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बँकेच्या ‘एटीएम’ मधून पैशांच्या गैरव्यवहार करणाऱ्या चाळीसगाव येथील ३ संशयितांकडून पोलिसांनी रोकडसह मुद्देमाल जप्त केला आहे. यातील काही रक्कम व मुद्देमाल अजून ताब्यात घेणे बाकी असून, ज्यांनी या संशयितांकडून पैसे घेतलेले आहे. अशांना पोल्स ठाण्यात अटक करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. आरोपींनी त्यांच्याकडील रक्कम जमा केली नाही तर, त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समजले जाईल, असे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

सविस्तर माहिती अशी की, प्रवीण देविदास गुरव (वय ३८), दीपक भिकन भिकन पवार (वय ३४, पाटणदेवी रोड, आदित्यनगर) हे दोघे सिक्यूर हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनीमार्फत कस्टोडियन म्हणून बँकांमधून रोख रक्कम काढून ‘एटीएम’मध्ये भरण्याचे काम करतात. या दोघांनी मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी थोडी थोडी रक्कम मिळून एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपये परस्पर काढून ते एकमेकांमध्ये वाटून घेतले.

हा संपूर्ण गैरव्यवहार ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (वय ४३, रा. गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्तीनगर जळगाव) यांना लक्षात आला. मात्र, त्यांनी याबाबत कंपनीला न कळवता यातील संशयित प्रवीण गुरव याने १४ लाख रुपये घेतले. त्यामुळे त्याने दोन्ही संशयितांना मदत करून कंपनीला खोटा ऑडिट अहवाल तयार करून पाठवला. हा प्रकार लक्षात येताच १८ डिसेंबरला फिर्याद गोरक्षनाथ (वय ३८, रा. पंचवटी, नाशिक) यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांना तिघ संशयितांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील गैरव्यवहार केलेली रक्कम हस्तगत करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. ज्यात उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, महेंद्र पाटील, दीपक पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, ज्ञानेश्वर पाटोळे, विनोद खैरनार, आशुतोष सोनवणे, अमोल भोसले व महिला कर्मचारी सभा शेख यांची नेमणूक केली होती. तपासदरम्यान, पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व गैरव्यवहाराच्या रकमेतून घेतलेली कार असा एकूण, १९ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

संशयितांना रक्कम जमा कारण्यासाठी नोटीस

दरम्यान, आरोपींना गैरव्यवहार केलेली उर्वरित रक्कम त्यांच्या ओळखीच्या काही व्याक्तींना सिलेली असून, ही रक्कम देखील पोलिसांकडून जमा केली आहे. ज्यांनी या संशयितांकडून हे पैसे घेतेले असतील त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन रक्कम जमा करण्याबाबत काहींना नोटीस दिल्या आहे. तरीही त्यांनी रक्कम जमा केली नाही तर त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.