ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा

0

लोकशाही विशेष लेख

भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या संकेतस्थळावर यांचा उल्लेख हा ‘आद्य प्रवर्तक’ असा केलेला आहे. कलकत्त्याच्या अलिपूर येथे २३ एप्रिल, १८७५ साली यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवातीची काही वर्षे आसाममधील ज्यूट बागायतींमध्ये घालविली, परंतु इंग्लंडमध्ये सुट्टीवर असताना एके दिवशी त्यांनी १९०० पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympiacum) भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि २०० मीटर स्प्रिंट आणि २०० मीटर हर्डल्स या दोन स्पर्धांमध्ये दोन रौप्यपदके जिंकून तो निर्णय सार्थ ठरवला. ऑलिम्पिक नंतर १९०५ साली ते कायमचे इंग्लंड येथे स्थायिक झाले. नंतर, ते अमेरिकेत हॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी स्थलांतरित झाले आणि तेथे नॉर्मन ट्रेवर हे नवे नाव घेऊन तेथील बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. ते एक अष्टपैलू खेळाडू होते. १८९९ मध्ये भारतीय फुटबॉलमध्ये सर्वप्रथम हॅटट्रिकची नोंद त्यांच्या नवे आहे, तसेच त्यांनी रग्बीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आणि असंख्य मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतला.

एका जीवनकाळात दोन नावे असलेला माणूस अ‍ॅथलेटिक्समध्ये असणे असामान्य आहे, परंतु ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय म्हणून अनेक जण श्री. नॉर्मन प्रीचर्ड (Mr. Norman Pritchard) यांचा सन्मान करतात. ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्य पदके जिंकण्याच्या प्रीचर्डने केलेल्या अनोख्या कामगिरीबद्दल प्रख्यात जर्मन प्रशिक्षक आणि खेळाडू डॉ. पेल्तेझर म्हणाले, “भारतीयांनी श्री. नॉर्मन प्रीचर्ड १९०० पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा आशिया खंडातील पहिला खेळाडू होता याचा अभिमान बाळगला पाहिजे. ही एक शानदार सुरुवात होती… आशियासाठी एक भव्य सुरुवात.”

ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी इतर आशियाई खेळाडूंना आणखी २८ वर्षे लागली. प्रीचर्ड यांचे योगदान अद्वितीय आणि अविस्मरणीय आहे – त्यांनी त्या काळच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंबरोबर समान अटींवर स्पर्धा करण्यासाठी आशियाई खेळाडूंसाठी पहिल्यांदाच दरवाजे उघडले.

 

डॉ. निलेश जोशी, जळगाव
संपर्क : ७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.