एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत निखील उर्फ पिया सुनिल कुडे स्थानबंध्द

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी जमवुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी करणे, साथीदारांसह गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे एकुण 5 गुन्हे दाखल असलेला निखील उर्फ पिया सुनिल कुडे (24) रा. एम.जे नगर, चाळीसगांव जि. जळगांव यास स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर जि. कोल्हापुर येथे उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस नाईक दिपक पाटील, पोकाँ अमोल भोसले यांच्या ताब्यात देवुन रवानगी करण्यात आली आहे.

त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन 1981 नुसार “वाळु तस्कर” या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निखील उर्फ पिया सुनिल कुडे याचे विरुध्द पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण, पोकॉ चत्तरसिंग महेर, दिलीप सत्रे, प्रविण देवरे, विजय पाटील, समाधान पाटील मदतीने चौकशी पुर्ण करुन दिनांक 16/06/2023 रोजी वरिष्ठ यांना अहवाल पाठवला होता. त्याचेवर स्थानबद्ध करण्याचा आदेश आल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील पोलीस नाईक विनोद भोई, राहुल सोनवणे, पोकॉ विजय पाटील, भरत गोराळकर यांनी दिनांक 17/07/2023 रोजी आरोपीस ताब्यात घेण्यात आले होते.

यापुर्वी देखील सराईत गुन्हेगार नामे निखील उर्फ भोला सुनिल अजबे (21) रा. नारायणवाडी, चाळीसगांव यास मध्यवर्ती कारागृह, अमरावती व वाजीदखान साबीरखान (23) वर्षे रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगांव ता. चाळीसगांव जिल्हा जळगाव यास मध्यवर्ती कारागृह येरवडा, जि. पुणे येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

यापुढे भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करुन, चाळीसगांव शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कठोर कायद्यान्वये अतीशय कडक कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त दिवस कारागृहात स्थानबध्द करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.