एरंडोल येथे पुनर्निरीक्षण कार्यक्रमावर बीएलओ बैठक व प्रशिक्षण संपन्न…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची बैठक व प्रशिक्षण येथील पं.स. सभागृहात तहसिलदार सुचिता चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. बैठकीत तालुक्यातील 137 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना भारत निवडणुक आयोगाने मतदान यादीचा घोषीत विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत आढावा बैठकीत सुचना देण्यात आल्या. त्याचबरोबर बीएलओंना भारत निवडणुक आयोगाने तयार केलेल्या बीएलओ अ‍ॅप्लीकेशन बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी दिव्यांग मतदार आणि तृतियपंथी मतदारांच्या नावाची नोंदणी तसेच नावात दुरुस्ती, मयत, स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळणे, मतदार यादीत अस्पष्ट असलेल्या मतदारांचा नव्याने फोटो घेवुन तो अद्यावत करणे, मतदार यादीमधील 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार असल्यास त्यांची घरोघरी जाऊन खात्री करणे, घरोघरी जावुन नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे आदी कामांबाबत सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीस एरंडोल तालुक्यातील सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तसेच निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार किशोर माळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.