मॉन्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात या तारखेला बरसतील सरी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सर्व देशभरात उष्णतेच्या लाटेने हाहाकार पसरला आहे. त्यात आज हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच पोहोचल्याची औपचारिक घोषणा केली आहे. साधारणपणे मान्सून दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा तीन दिवस आधीच त्याने हजेरी लावली आहे. सर्व परिस्थितीचे आकलन केल्यानंतर आज केरळमध्ये मान्सूनच्या आगमन झाल्याची घोषणा करण्यात आल्याचे IMD चे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आणि ईशान्येकडील अनेक भाग व्यापला आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवसांत तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
९ जून रोजी मान्सून महारष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. यंदा राजस्थानच्या चुरूमध्ये कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतात अनेक ठिकाणी तापमान ५० अंशाच्या जवळ पोहोचले आहे.
केरळ नंतर मान्सून इतर राज्यांमध्ये शक्यतो या तारखेपर्यंत पोहोचेल जाणून घ्या.
केरळ- 30 मे, तामिळनाडू- 1 ते 5 जून, आंध्र प्रदेश- 4 ते 11 जून, कर्नाटक- 3 ते 8 जून, महाराष्ट्र- 9 ते 16 जून, गोवा- 5 जून-10 जून, ओडिशा- 11 ते 16 जून, उत्तरप्रदेश- 18 ते 2 जून, उत्तराखंड- 20 ते 25 जून, हिमाचल प्रदेश- 22 ते 23 जून, जम्मू-काश्मीर- 22 ते 29 जून, दिल्ली- 27-28 जून, बिहार- 13 ते 18 जून, झारखंड- 13 ते 17 जून, पश्चिम बंगाल- 7 ते 13 जून, छत्तीसगड- 13 ते 17 जून, गुजरात- 19 ते 30 जून, मध्य प्रदेश- 16 ते 21 जून, पंजाब- 26 जून ते 1 जुलै, हरियाणा- 27 जून ते 3 जुलै, राजस्थान- 25 जून ते 6 जुलै

 

Leave A Reply

Your email address will not be published.