दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने मोबाईल हिसकावला

0

जळगाव ;- शहरातील नवजीवन सुपर शॉपी समोरील रोडवर तिघांनी दुचाकीवर येत एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना १० रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सुनील एकनाथ भामरे वय ५७ हे नोकरी करीत असून ते १० रोजी शहरातील नवजीवन सुपर शॉपी समोर रोडवर उभे असताना दुचाकीवरून तीन जण आले असता शेवटी बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल १५ हजार रुपयांचा हिसकावून तिघांनी पळ काढला . याप्रकरणी ११ रोजी सुनील भामरे यांनी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरून तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.