विश्व रेडीओ दिनानिमित्त मु. जे. महाविद्यालयात चर्चासत्र !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
व्हाईसलेस पीपल्स व्हाईस म्हणजे आजचा समुदाय रेडीओ हे रेडीओचे नवे रूप आहे.यात तळागाळातील सामन्यातील सामान्य व्यक्तीचा आवाज पोहचवला जात आहे असे जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या वतीने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या रेडीओ मनभावन ९०.८ एफ.एम. स्टुडीओच्या दालनात विश्व रेडीओ दिवसानिम्मित आयोजित “रेडीओ चे बदलते स्वरूप” या विषयावर प्रा.संदीप केदार यांनी आपले विचार मांडले.यावेळी कान्ह ललित कला केंद्राच्या समन्वयक यामिनी कुलकर्णी, आरजे स्वामी, आरजे समृद्धी,तांत्रिक समन्वयक राहुल पाटील,प्रा.केतकी सोनार आदी.उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.केदार यांनी सांगितले कि भारतात रेडिओचा ट्रेंड अनेक वर्ष जुना आहे. प्राचीनकाळी रेडिओ हे मनोरंजनाचे एक साधन होते. जे लोक मोठ्या आवडीने ऐकत. या माध्यमातून देशाच्या आणि जगाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचल्या जात होत्या. आज देखील रेडिओ लोकांचा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चालवलेला “मन की बात” हा रेडिओ शो देखील 2014 पासून सुरू आहे ज्यामध्ये लोक मोदीजींचे विचार ऐकतात.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आरजे समृद्धी हिने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.