‘डब्ल्यूपीएल’ साठी स्मृती मंधानाला ३ कोटींहून अधिकची बोली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
इंडियन प्रीमिअर लिगमुळं अनेक नवोदित क्रिकेटपटूंना संधी मिळाली. कित्येक क्रिकेटपटू नावारुपाला आले. याच आयपीएलच्या धर्तीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय वतीने पहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीग अर्थात ‘डब्ल्यूपीएल’ आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीग साठी खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेला लिलाव स्मृती मंधाना पासून सुरू करण्यात आला आहे. तिच्या नावावर ३ कोटीं ४० लाखांची बोली लावून अधिकची बोली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लावली.

मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स अशा 5 फ्रँचायझीचा पहिल्या सीझनसाठी समावेश आहे. या लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 202 कॅप्ड आणि 199 अनकॅप्ड खेळाडू आहेत. 8 असोसिएट देशांचे खेळाडूही आहेत. या निवडलेल्या खेळाडूंमध्ये 246 भारतीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.

या मेगा लिलावात 409 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 15 देशांच्या महिला क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे. BCCI च्या म्हणण्यानुसार, जगभरातील 1,525 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये आता 90 स्लॉटसाठी स्पर्धा होणार आहे. लिलावात 24 खेळाडूंची सर्वोच्च आधारभूत किंमत 50 लाख रुपये आहे. यामध्ये 10 भारतीय आणि 14 विदेशी खेळाडू आहेत. तर 30 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 40 लाख ठेवली आहे. यासोबतच भारताच्या अंडर-19 महिला T-20 विश्वचषक विजेत्या संघातील सर्व खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.