मू.जे.महाविद्यालयात उत्स्फूर्त हिंदी भाषण स्पर्धेने हिंदी सप्ताहाचा समारोप

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. दि.१४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि.१४ तारखेला डॉ. कृष्णा गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख, श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याव्यतिरिक्त सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘हिंदी मे बात है’, ‘कौन बनेगा ज्ञानपती – हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा’ हे कार्यक्रम देखील घेण्यात आले.

त्याच बरोबर आज दि.२१ सप्टेंबर रोजी मू.जे. महाविद्यालयात हिंदी सप्ताहाच्या समारोपच्या कार्यक्रमात हिंदी विभाग आणि बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय (राजभाषा विभाग), जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी हिंदी उस्त्फुर्त भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मौलिक विचार प्रकट केलेत.

या स्पर्धेत पारितोषिक विजेते विद्यार्थी – प्रथम पारितोषिक – कंचन पाटील (द्वितीय वर्ष कला), द्वितीय पारितोषिक – दिनेश नारखेडे (तृतीय वर्ष कला), तृतीय पारितोषिक – प्राची बाजपाई (प्रथम वर्ष कला), उत्तेजनार्थ पारितोषिक – पूर्वा वारूळकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक दुष्यंत तिवारी (तृतीय वर्ष कला)

स्पर्धेचे परीक्षण जळगाव येथील साहित्यिक डॉ. पुरुषोत्तम पाटील आणि प्रा. मुक्ती जैन यांनी केले. सर्व विजयी स्पर्धकांना मू.जे.च्या भाषा प्रशाळेचे संचालक डॉ. भूपेंद्र केसुर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बँक ऑफ बडोदा राजभाषा अधिकारी सुकन्या देवी यांनी हिंदी भाषेमध्ये असलेल्या रोजगाराच्या संधीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी विषय घेवून शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या प्रत्येक कार्यालयात राजभाषा अधिकारी, हिंदी अनुवादक, हिंदी लघुलेखक, हिंदी अधिकारी, शिक्षण क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक आणि सिनेमा, आकाशवाणी, धारावाहिक, जाहिरात क्षेत्रात असलेल्या संधीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ.रोशनी पवार यांनी केले,  तर सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.विजय लोहार यांनी केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.