डिजिटल शिक्षण ही काळाची गरज- शुभंकर मुखर्जी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
आजचे युग हे आधुनिक संगणकीय युग आहे. संगणकामुळे आज जग जवळ आले असून शिक्षणात मोठी क्रांती ही संगणकामुळे घडून आली आहे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावी. यासाठी डिजिटल शिक्षण ही काळाची गरज असल्याने भावी शिक्षकांनी दोन पावले पुढे टाकत शिक्षणातील बदलते प्रवाह लक्षात घेऊन स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे, तसेच पारंपारिक शिक्षण पद्धती व डिजिटल शिक्षण प्रणालीचा समन्वय साधून तो आत्मसात करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन इस्ट्रीजिओन एज्युटेक सर्विसेस(ओ.पी.सी. )प्रा.लि. संचालक सॅनविल श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे ट्रेनिंग मॅनेजर शुभंकर मुखर्जी यांनी झालेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

के. सी. ई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातर्फे भावी शिक्षकांसाठी “डिजिटल क्षमता” यावर 16 ते 21 जानेवारी या सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह सर्टिफाइड एज्युकेटर अमित कुमार तर अध्यक्षस्थानी शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. आर. राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. प्रज्ञा विखार यांनी केले. प्रा. शैलजा भंगाळे यांनी भावी शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण प्रणालीचा अवलंब केला पाहिजे हा यामागचा हेतू आहे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाला शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ स्वाती चव्हाण, प्रा.गणेश पाटील,संगणक- लिपिक मोहन चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.