दहिगाव येथील कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

मसाकाच्या आजारी कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू झाला. वेळेवर पैसे मिळाले असते तर कदाचित आज ती व्यक्ती जिवंत असती. जिल्हा बँकेने लक्ष देण्याची गरज होती. दहिगाव ता.यावल जवळ असलेल्या कोरोपावली गावातील सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे एकूण साडेपाच लाख रुपये घेणे असून ते मिळाले नसल्याने त्याचा पैसे वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा बँकेने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. असे उत्पादकांकडून म्हंटले जात आहे. कोरपावली येथील देवेंद्र गिरधर पाटील वय 48 हा मधुकर सहकारी साखर कारखान्यात गेल्या पंधरा वर्षापासून डिस्टलरी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
36 महिने त्याचे कामाचे वेतन कारखान्याकडे रखडल्याने तसेच उसाचे एक लाख रुपयाचे जवळपास पेमेंट बाकी असल्याने ते कारखान मालकाने गेल्या तीन ते चार वर्षापासून थकवून ठेवले होते. कर्मचाऱ्यांची वेळोवेळी मागणी होत असतांना देखील जिल्हा बँक याकडे दुर्लक्ष करीत आहे. देवेंद्र पाटील हे गेल्या तीन वर्षापासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी पैसा उपलब्ध नसल्याने त्यांचा आज दिनांक 18 रोजी सकाळी मृत्यू झाला. त्यांचे पक्षात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. पाटील यांचे कारखान मालकाकडे साडेपाच हजाराचे घेणे आहे. जिल्हा बँकेने आता तरी जागृत होऊन अशा गरजू कर्मचाऱ्यांचे पेमेंट अदा करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. देवेंद्र पाटील उर्फ कुडा हे अल्पभूधारक आहेत. त्यांची परिस्थिती आर्थिक नाजूक आहे हे बँकेने लक्षात घेण्याची गरज होते.

Leave A Reply

Your email address will not be published.