राज्य ऑलिंपिक स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धा पुणे येथे नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचा महिला व पुरुष संघ सहभागी झाला होता या संघात एकलव्य क्रीडा संकुल संचालित एकलव्य स्क्वॅश अकॅडमीच्या खेळाडूंची निवड करण्यात आलेली होती.

या स्पर्धेत मुळजी जेठा महाविद्यालयाचे विद्यार्थी कुशल भावसार व उत्कर्षा अत्तरदे यांनी मिश्र दुहेरी या प्रकारात, के. सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वर्षा कुमावत व के.सी.ई. ओरियन स्टेट बोर्ड स्कूल ची विद्यार्थिनी याज्ञिका पाटील यांनी महिला दुहेरी या प्रकारात तर राहुल पाटील व मूळजी जेठा महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम सिसोदे यांनी पुरुष दुहेरी प्रकारात उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक प्राप्त केले. याच बरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेतून एकलव्य स्क्वॅश अकॅडमीच्या खेळाडूंनी पटकावलेले हे कांस्यपदक जळगाव जिल्ह्याकरिता अभिमानाची बाब आहे.

महिला व पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत शामराव पाटील यांची निवड करण्यात आली होती तसेच महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून के.सी.ई बी.पी.एड. महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण दामोदर कोल्हे यांची तर पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांची निवड करण्यात आली होती.

यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे मा. अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे, के.सी.ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे तसेच जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.