भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात क्रॅश…

0

 

गोवा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्याच्या किनाऱ्यावर समुद्रात क्रॅश (Indian Air Force MiG-29K fighter jet crashes in sea off Goa coast) झाल्याचे वृत्त आले आहे. विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून समुद्रात उडी मारली. त्यानंतर नौदलाने शोध आणि बचाव सूत्र तातडीने हालवत या वैमानिकाला वाचवण्यात यश मिळवले. सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मिग-29 ‘के’ लढाऊ विमानाचा अपघात नेमका कसा झालाचा याचा तपास करण्याचे आदेश BOI ला देण्यात आले आहेत.

गोव्याच्या (Goa) किनाऱ्यावर नियमित उड्डाण करून तळावर परतत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे मिग-२९ के हे लढाऊ विमान समुद्रात कोसळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुदैवाने या उपघातात वैमानिक सुखरूप असून, (Pilot Safe) त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.