ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारसह 18 जणांवर खुनाचा खटला चालणार…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कुस्तीपटू सागर धनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि इतर १७ जणांवर खुनाचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. कनिष्ठ कुस्तीपटू सागर धनखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने सुशील कुमार आणि अन्य १७ जणांविरुद्ध खून, हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले आहेत. यासोबतच न्यायालयाने दोन फरार आरोपींवरही आरोप निश्चित केले आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येने क्रीडा क्षेत्र हादरले होते. 4 मे 2021 रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सोनीपतचा रहिवासी असलेल्या सागर धनखरला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एक व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पियन सुशील कुमार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली.

कनिष्ठ कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने आरोप निश्चित करण्याबाबतचा आपला आदेश राखून ठेवला आहे. आज सर्वांवर आरोप निश्चित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.