‘मनरेगा’ मार्फत 100 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नांदेड येथे संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

संसाधन व्यक्ती (Resource Person) उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.

वयाची अट : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान  : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nrega.nic.in

असा करा अर्ज

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

Leave A Reply

Your email address will not be published.