मासिक पाळीच्या काळात सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यसभेत राजद खासदार मनोजकुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी हे उत्तर दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकानी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

स्मृती इराणी या मुद्द्यावर बोलताना इराणी म्हणाल्या, “मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी हे अपंगत्व नाही तर स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा नैसर्गिक भाग आहे. जर मासिक पाळीच्या मुद्यावरून महिलांना सुट्टी दिली गेली तर त्यांच्याशी भेदभाव होऊ शकतो. आपण असे मुद्दे उपस्थित करता कामा महिलांना समान संधींपासून वंचित राहावं लागेल.

पण मासिकपाळीच्या काळातील स्वच्छतेचं महत्व स्विकारताना इराणींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे एक राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्याची घोषणा केली. या धोरणाचा उद्देश देशभरात योग्य मासिक पाळी स्वच्छता उपायांबाबत जागरुकता निर्माण करणं आहे.

दरम्यान, यावेळी इराणी यांनी सांगितलं की, सध्याच्या मासिक पाळी स्वच्छता मोहिमेचा उद्देश १० ते १९ वर्षीय मुलींसाठी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे समर्पित ही योजना विविध शिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमांद्वारे मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबाबत ज्ञान वाढवण्यावर केंद्रीत करणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.