माहेरून ३ लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माहेरहून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे माहेर असलेल्या विवाहिता माधुरी पवन धनगर (वय २१) यांचा विवाहित कोल्ह ता.पाचोरा येथील पवन बाबूलाल धनगर यांच्याशी मार्च २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार लग्न झाले. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर मात्र पती पवन धनगर याने विवाहितेला टोमणे देऊन घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला.

मात्र परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने ३ लाख रुपये देऊ शकले नाही. या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली तर पैसे आणले नाही म्हणून सासू आणि सासरे यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले.

दरम्यान विवाहिता माहेरी निघून आल्या. शुक्रवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन बाबूलाल धनगर, सासु कल्पना बाबूलाल धनगर, सासरे बाबूलाल महादू धनगर सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.