मनवेल जि.प. शाळेच्या वॉलकंपाऊंडच्या कामाला सुरवात

लोकशाही बातमीचा परीणाम

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

मनवेल येथील जि.प.प्राथमिक शाळेतील वॉलकपाऊडचे काम गेल्या पाच वर्षापासून रखडले होते याबाबतचे वृत्त दै.लोकशाही मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाच्या हालचाली गतिमान होऊन शाळेच्या वॉलकपाऊडचे काम सुरु करण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन विभाग जळगाव ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग व रोजगार  हमी विभाग अंतर्गत १३ लाख रुपयाचा नीधीतुन शाळेचे वॉलकपाऊड मंजूर करण्यात आले असून कामाला सुरुवात होऊन अवाध्या पंधरा दिवसात काम बंद झाल्याने तब्बल पाच वर्षा पासून बंद होते.

२४ ऑगस्ट २०२३ च्या दैनिक लोकशाही अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले तर २८ ऑगस्ट रोजी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना करुन नवीन समीती गठीत होऊन आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत वॉलकपाऊडचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पालकांशी सहमतीने गठीत केलेल्या पदाधिकारी यांनी त्वरीत वॉलकपाऊडचा रखडलेला प्रशन त्वरीत मार्गी लावून वॉलकपाऊडचा प्रशन सोडविल्याने वॉलकपाऊडचे काम अखेर सुरु झाले असून पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

शाळेतील शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचे  वॉलकपाऊडचे काम पुर्ण करुन शाळा लोकसहभागातून विकास करण्यात येईल. ह.भ.प. अंकुश पाटील, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समीती जि.प.शाळा मनवेल गावातील मुले इंग्लिश मीडियममध्ये जात आहे. त्यामुळे जि.प.शाळेतील पट भौगोलिक सुविधाचा अभावमुळे पटसंख्या कमी होत असून लोकसहभागातून शाळेच्या विकास करुन इंग्लिश मीडियमसारखी शाळा करुन पटसख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

– देविदास कोळी

उपाध्यक्ष 

शाळा व्यवस्थापन समीती जि.प.शाळा मनवेल

Leave A Reply

Your email address will not be published.