सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

ठाणे येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव संस्था एक दिवा शिक्षणाचा एक दिवा आनंदाचा दिपोत्कर्ष टप्पा ४ या फाऊंडेशनच्या मुळगाव जळगाव येथील रहिवासी बिंदीयाताई सोनवणे यांनी सामाजिक दायित्व जपत नुकताच येणाऱ्या दिवाळी सणाचे औचित्य साधून चुंचाळे तालुका यावल येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील २७ गरजवंत विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेस व चप्पल तसेच मिठाई वाटप केले.

श्री समर्थ सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहाचे अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी (तेली) व त्यांच्या पत्नी सौ. वदंनाताई चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या वसतीगृहातील गरिब गरजवंत विद्यार्थ्यांची समस्या हेरुन व त्यांची दिवाळी सुद्धा आनंदाने साजरी व्हावी या हेतूने दातृत्वशाली उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाऊंडेशनच्या बिंदीयाताई सोनवणे यांच्या माध्यमातून दि. १७ आक्टोबर  रोजी वसतीगृहात जाऊन २७ विद्यार्थ्यांना ड्रेस व चप्पल व मिठाई वाटप करण्यात आले.  मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बिंदीयाताई सोनवणे यांना मनस्वी आनंद वाटला असे त्यांनी मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव जगन्नाथ कोळी यांनी भूषविले. यावेळी नायगाव येथील प्रगतिशील शेतकरी काशिनाथ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक व्हि. जी. तेली, अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी, डि. बी. मोरे, एम. आर. चौधरी, एस. एस. पाटील, वाय. वाय. पाटील, सुधिर चौधरी, प्रशांत सोनवणे, एस. बी. गोसावी, राकेश अडकमोल, एन. जी. पाटील, जमीला तडवी, शारदा चौधरी, वदंना चौधरी, ए. बी.  बोरसे, रविंद्र पाटील, कैलास निळे, अरुण कोळी, योगेश कोळी, बाजिराव पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक डि. बी. मोरे व एस. बी. गोसावी यांनी केले. तर आभार वसतीगृहाचे अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.