नेहरू युवा केंद्र व नक्षत्र फाउंडेशनतर्फे मेगा स्वच्छ भारत अभियान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क              

भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि नक्षत्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात विशेष मेगा क्लीन ड्राइव्ह घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव ब्लॉकमध्ये स्वच्छ भारत अभियान व २.० या निमित्त स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत भडगाव शहरातील तहसील कार्यालय, रजनीताई नाना साहेब देशमुख महाविद्यालय, दादासो सुपडू मालजी कनिष्ठ महविद्यालय व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल या परिसरातील कचरा संकलित करून त्याची  विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कॉलेजमध्ये जनजागृती करून कचरा संकलन करण्यात आला.

हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी आणि युथ लीडर तथा नक्षत्र फाउंडेशनचे तेजस पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पो. हे. कॉ नितीन रावते, स्वप्नील चव्हाण, राजेंद्र पाटील, कॉलेजचे प्राचार्य आणि न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिन्सिपल यांनी विशेष कौतुक केले. या सर्व कार्यक्रमाचे नेतृत्व अश्विनी सोमवंशी, प्रतीक पाटील, कृष्णा भोसले, प्रेरणा पाटील, शारुख मण्यार यांनी केले. या सोबत व सर्व टीमने आदी सहकार्यानी श्रमदान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.