खुशखबर : केरळात मान्सूनचे आगमन

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची (Monsoon 2023) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल (Monsoon In Kerala) झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील शेतकऱ्यांसह जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येतील काही राज्यांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत पासून केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. केरळच्या किनारपट्टीवर ४ जून रोजी मान्सून धडकू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तविला होता. मागील दोन वर्षांचा विचार केला तर मान्सूनचे २०२० साली १ जून रोजी, २०२१ साली ३ जून रोजी तर २०२२ साली २९ मे रोजी आगमन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.