मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारली

0

मुंबई- – मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की, खेळासाठी राखीव असलेल्या मैदानात उपोषणाला परावानगी नाही. शिवाय आझाद मैदानाची इतकी क्षमता नाही की, इथे मोठे आंदोलन होऊ शकेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावं. दुसरीकडे, आझाद मैदानावर मराठा आयोजकांकडून तयारी सुरु झाली आहे.

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.