जरांगे पाटील १४ दिवसांपासून उपाशी, वैद्यकीय तपासणीलाही नकार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असून रविवारी तेरा दिवस झाले. शनिवारी रात्री पासून जरांगे यांनी औषधं, पाणी, आणि सलाईन घेणे लांबच परंतु नियमीत होणाऱ्या तपासणीसही नकार दिला.

मराठा समाजाला सरसगट आरक्षणाचा आदेश सरकार काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे सांगुन आजपर्यंत मी सरकारचे ऐकले. शब्दाला जागलो मात्र सरकार शब्दाला जागत नसल्याचा आरोप केला. शनिवारी रात्रीपासुन मनोज जरांगे यांनी औषध, पाणी व सलाईन घेणे बंद केले असतानाच रविवारी (दि. १०) नियमीत होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसही त्यांनी नकार देत उपोषणावर ठाम असल्याचे सांगीतले.

यावेळी जरांगे म्हणाले की, आजपर्यंत मी सरकारचे ऐकले. शब्दाला जागलो. मात्र सरकार शब्दाला जागत नाही. आम्ही जी मागणी केली ती पूर्ण होत नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार. सरकारने हवे तेवढा वेळ घ्यावा मी उपोषणावर ठाम आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.