जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार कधी?

शाळा उघळडुन १५ दिवस झाले तरी विद्यार्थी गणवेश विना

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल ता.यावल: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे, असा आदेश शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिला असूनही शाळा उघडळून १५ दिवसाच्या कालावधी झाला मात्र विद्यार्थी गणवेश विना शाळेत येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यभरातील गणवेशाचा रंग एकच राहणार असल्याचे सागीतले असल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश कसा मिळणार आणि केव्हा मिळणार? हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडला आहे.

राज्य सरकारकडून 30 मे 2023 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
30 मे 2023 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती वरून गणवेश उपलब्ध करून द्यावेत असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना हे आदेश प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रति लाभार्थी दोन गणवेश दिले जाणार आहेत. यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये तरतूद आहे. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश दिला जावा असे असूनही एकही गणवेश वाटप झाले नसून १५ आँगष्ट पर्यत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे नियोजन दिसून येत आहे.

मोफत गणवेश कोणाला मिळणार?
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवी इयत्ता मधील सर्व मुली, अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखाली पालकांची मुले यांना मोफत गणवेश दिला जाणार असून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अद्यापही झाले नसल्यामुळे शाळेत विद्यार्थी गणवेशची प्रतिक्षा करीत आहे.

शाळा व्यवस्थापन समीतीचे अधिकार कागदावर
विद्यार्थ्यांना गणवेश करीता लागणारा कापड खरेदी करणे, गणवेश शिवणे करीता स्थानिक टेलरला प्राधान्य देणे, कोटेशन मागविणे गरजेचे असून यांचा अधिकार शाळा व्यवस्थापन समीतीला आहे. मात्र स्थानिक दुकानदार व टेलर यांना डावलून बाहेरून काम केले जात असल्यामुळे पालकवर्गात संभ्रम निर्माण होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.