धक्कादायक; मधमाशांच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नगरदेवळा येथील इसमाचा कामावरून घरी परतत असतांना दुपारी चारच्या सुमारास अचानक मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिंदोळ रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास रोजंदारी चे काम करून परतत होते. यावेळी शिंदोळ गावाजवळ आगे मोहळच्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात सैयद सबदर सैयद इस्माईल (५८) यांच्या तोंडाला मधमाशा चावल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही त्या माश्या चावल्या यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

सैय्यद इस्माईल हे मजुरी करून आपला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. मयत सैय्यद इस्माईल यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.