शिवसेनेचा “एक कॉल प्रॉब्लेम सॉल” फुकट कामाचा सपाटा सुरू

पावसाने महिन्याभरापासून पडलेले विद्युत पोल,चोरीला गेलेल्या विद्युत तारा ओढण्याचे काम सुरू

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दर गुरुवारी” एक कॉल प्रॉब्लेम सॉल” शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे, गोरगरीबांचे अडलेली शासकीय कामे, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतलेले पैसे परत घेऊन ते काम फुकट करून देण्याचा सपाटा सुरू असून उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तालुक्यात गाव तिथं शाखा,घर तिथे शिवसैनिक हे अभियान जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शहरप्रमुख गजानन ठोसर,तालुकाप्रमुख दिपक चांभारे, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव यांनी सुरू केले असून प्रत्येक रविवारी तालुक्यातील पाच सहा गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देवधाबा – भालेगावात पदाधिकारी गेले असता तेथील शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ईले.खांब कोसळल्याने व काही ठिकाणी विद्युत तार चोरीला गेले असल्याने शेतातील पिकांना विहिरीत पाणी असुन सुद्धा लाईट नसल्याने देता येत नाही,उघड्या डोळ्यादेखत पिके सुकुन जात असल्याची खंत भालेगांव येथील शेतकरी हरी निवृत्ती वराडे, सचिन देशमुख, एकनाथ टेकाडे आदी शेतकऱ्यांनी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने सह पदाधिकाऱ्यांना सांगितली. आज गुरुवार रोजी “एक काॅल प्राॅब्लेम साॅल ” कार्यक्रम निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरताच कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठवुन पोल उभारणी,तार ओढण्याचे काम युध्दस्तरावर सुरू झाल्याने गावकऱ्यांनी शिवसेना पदाधिकारी व “एक काॅल प्राॅब्लेम साॅल ” टिम चे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.