जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माळी साम्राज्य तर्फे राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते आहे. यंदाचे राज्यस्तरीय माळी उद्योजक मेळाव्याचे तिसरे वर्ष असून लवकरच मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्यात राज्यभरातुन यशस्वी समाज बांधव आणि भगिनी सहभागी होत असतात. दरम्यान राज्यभरातील माळी समाजातील उद्योजकांचा व तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे देखील आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पुरस्कारात युवा उद्योजक, स्मार्ट उद्योजक, लघु उद्योजक, आदर्श महिला बचत गट, समाजभूषण, वैद्यकीय सेवा, कृषीसेवक, आदर्श शिक्षक, कर्तव्यदक्ष अधिकारी, उत्कृष्ट पत्रकारिता, आरोग्य दूत, उत्कृष्ट अभियंता, वन मित्र, चाणक्य, साहित्यिक क्षेत्र यांचा समावेश असणार आहे.
या पुरस्काराच्या नियम व अटी-
१) आपण कार्यरत असलेल्या सेवेत किमान पाच वर्षे पुर्ण झालेली असावी
२) व्यवसायाची/ उद्योगाची नोंदणी शासन दरबारी असणे आवश्यक
३) व्यवसाय/उद्योगात स्वत: काही तरी नवीन युक्ती लावून उद्योगात यशस्वी झालेले असावेत
४) आपणास पुरस्कार का दिला जावा या आशयाचे आपले पत्र
५) पूरस्कार जाहीर झाल्यास तो स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्र
६) पुरस्कार वितरण समितीचे निर्णय अंतिम राहतील
पुरस्काराचे प्रस्ताव शॉप नं ३ ओम प्लाझा, गुजराथी गल्ली, चित्रा चौक जळगाव, 425001, http://Gmail – weeklymalisamrajya@gmail.com, bhushanm1137@gmail.comयेथे पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी 9595343872, 9595343873 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.