किराणा दुकानाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागातील किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले असून जीवित हानी टळली आहे.

श्रीराम मार्केट भागात प्रल्हाद कुमावत यांचे किराणा मालाचे दुकान असुन अचानक दुकानात आग लागली.  दि. १४ रोजी मंगळवारी ही घटना घडली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीय.  दुकानातील संपूर्ण मालाने आगीचे स्वरूप धारण केल्याने सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आपला जीव वाचावा यासाठी यांनी कामगारांनी दुकानाच्या बाहेर पडले.  दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

किराणा दुकानाला आग लागल्याचे माहीत पडताच माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. आगीला आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ जामनेर नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत भीषण आगीत दुकानातील लाखोंचा किराणा माल जळुन भस्मसात झाला. कुमावत यांच्याकडे उपजीविकेसाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.