मल्ल्याळम चित्रपटातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मल्ल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं मंगळवारी निधन झाले. केरळमधल्या कोल्लम इथल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप जास्त लोकप्रिय झाली होती. त्यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार करण्यात येतील, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. ‘फिल्म इम्प्लॉइज फेडरेशन ऑफ केरळ’ने (FRFKA) फेसबुकवर पोस्ट लिहित कुंद्रा जॉनी यांच्या निधनाची माहिती दिली. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका
केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी श्रद्धांजली वाहताना लिहिलं, ‘कुंद्रा जॉनी यांनी त्यांच्या चार दशकाच्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.’ मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींकडूनही सोशल मीडियाद्वारे कुंद्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.