‘ह्या’ मराठी गाण्याची जादू सातासमुद्रापार !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘बहरला मधुमास नवा’ (Behrla Madhumas) ह्या गाण्याने सर्वच रसिक प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवलाच नाही तर मोठे मोठे कलाकार सुद्धा ह्या गाण्यावर ठेका धरत आहे. ‘केदार शिंदे’ (Kedar Shinde) दिग्दर्शित शाहीर साबळे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या चित्रपटाने सध्या मनोरंजन विश्वाला वेड लावले आहे. महाराष्ट्राच्या मनातील थोर शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवन प्रवास या चित्रपटातून रसिकांच्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे. व हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा उतरत आहे.

२८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘बहराला मधुमास’ हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर धरलं. हेच नाही तर सोशल मीडियावर हे टेंडिंग मध्ये आहे. ह्या गाण्याने नुसता महाराष्ट्रातल्या जनतेलाच नव्हे तर सातासमुद्रापार असणाऱ्या लोकांना सुद्धा वेड लावले आहे. काहीदिवसांपूर्वीच टांझानियाच्या (Tanzania) बहीण-भावाच्या जोडीने यावर नृत्य करत सर्वांचेच मन जिकंले, किल पॉल असं त्या इन्फ्लुएनसरच नाव आहे. एवढेच नाही तर आता पुन्हा दोन जपानी कलाकारांनी या गाण्यावर भन्नाट डान्स करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. काकेताकु आणि पिरो या जोडीने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उताराला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.