ब्रेकिंग.. राज्यातील राजकीय पेच; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महिनाभरापासून सुरू असलेला राज्यातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Politics) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजूने 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र , कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

आज झालेल्या युक्तिवादा दरम्यान एकनाथ शिंदे यांचे वकील अॅड हरीश साळवे यांनी काही कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला. त्याशिवाय त्यांनी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश रमण्णा यांनी यावर बोलताना काही मुद्दे अतिशय घटनात्मक असल्याने तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचे म्हटले. सरन्याधीाशांनी दोन्ही बाजूंना मंगळवारपर्यंत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठासमोर नेणे गरजेचे असल्याची टिप्पणी केली होती. मात्र, त्याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.

सरन्यााधीश यांनी महत्त्वाची टिप्पणी करताना म्हटले की, गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार आहे. त्याशिवाय, बहुमताने सदस्य निवडू शकतात. एखादा वाद उद्भवल्यास विधानसभा अध्यक्ष हस्तक्षेप करू शकतात, अपात्रतेच्या अर्जावरील परिस्थिती अध्यक्षांनी जैसे थे ठेवावी, विधिमंडळ सचिवांनी विधिमंडळातील सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवावे, असे सरन्यायाधीशांनी म्हटले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.