येत्या ४८ तासात महाराष्ट्र गारठणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने १० ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरी भागात शेकोट्या पेटवल्या जात आहे. आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून, त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे.

विदर्भ मराठवाड्यात गारठा राहणार
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. पुणे शहरात सकाळच्या धुक्यातही वाढ झाली आहे. पुण्यात ही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४.९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोंदियाचे तापमान ९ अंश सेल्सिअस होते. मुंबईतील तापमान २३.२ अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान १०.६ तर नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.