खाद्यसंस्कृती; दही भल्ला/ दही वडा

0

लोकशाही विशेष लेख

रोज – रोज डाएट फूड, लो कॅलरी फूड, कमी तेलातले पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असताना एखाद्या वेळी थोडा दुजोरा दिला तर कहीच हरकत नाही. चला तर मग ताव मारुयात चटपटीत अशा रेसिपींवर…..

साहित्य

२ वाटी उडीद डाळ, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, मनुके (बेदाणे), २ वाटी दही, ४ चमचे साखर, मीठ, लाल मिरची पावडर, चाट मसाला, तळण्यासाठी तेल

कृती

१) प्रथम उडीद डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवणे.
२) नंतर ती घट्टसर बारीक वाटून घ्यावी.
३) त्यामध्ये मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
४) तेलामध्ये गोल आकारात वडे तळताना त्यामध्ये एक एक मनुका घालून तळून घेणे. (सोडा घालू नये डाळ दोन ते तीन तास भिजवलेली असल्याने वडे
हलके होतात.)
५) आता दोन वाटी दही आणि दोन ते तीन चमचे साखर मिक्सरला फिरवून घ्यावे व त्यामध्ये तळलेले वडे मूरवत ठेवून द्यावे.
६) खायला देताना घट्टसर दही प्लेटमध्ये घेऊन भिजवलेले वडे त्यावर ठेवून हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लाल मिरची पावडर, बेदाणे, चाट मसाला पावडर घालून खायला द्यावे.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.