अखेर.. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्रासह जळगावात कधी होणार निवडणूक

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.  7 टप्प्यात निवडणूका होणार. महाराष्ट्रासह देशात 26 जागांवर पोटनिवडणूक होणार आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात… संपूर्ण वेळापत्रक

पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला

दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला

तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी

पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी

सहाव्या टप्प्यातील 25 मे रोजी

सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून

मतमोजणी 4 जून रोजी

महाराष्ट्रात 20 मे रोजी मतदान

20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान असून यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.

———-

पत्रकार परिषदेतील महत्वाची मुद्दे 

देशात 97 कोटी मतदार

16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार

लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत

दीड कोटी कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी सज्ज

55 लाखांपेक्षा जास्त EVM तयार

5 लाख पोलिंग स्टेशन

2 वर्षांपासून आमची निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे

लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण

49.1 कोटी पुरुष, 47.1 कोटी महिला मतदार

1.82 कोटी नवीन  मतदार

21.5 कोटी युवा मतदार

48 हजार तृतीयपंथीय मतदान करणार

महिला मतदारांच्या संख्येत वाढ

82 लाख मतदारांचे वय 85 वर्षांपेक्षा जास्त

मतदारांसाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देणार

लोकसभा निवडणुकीत ज्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणे शक्य नसेल, अशा वृद्ध लोकांसाठी घरी सुद्धा मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देणार 85 लाख नवीन महिला मतदारांची नोंद

1 एप्रिलपर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनाही मतदानाचा अधिकार

मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले लोकसभा निवडणुकीबाबत ज्या मतदारांना काही तक्रारी असतील त्यांना सी व्हिजील अॅपवर तक्रार करता येणार आहेत

कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही

गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल

कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस सज्ज

प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रुमची स्थापना

तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर 1950

दारू, साड्या, पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करणार

निवडणुकीत कोणत्याही हिंसेला स्थान नाही

मसल पावर, मनी पावर रोखणार

नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई

प्रचारात कोणावरही वैयक्तिक टीका करू नये

द्वेष पसरवणारी वक्तव्ये टाळा

खोट्या बातम्या मागची सत्यता आम्ही देणार

पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही

सोशल मीडियावर अफवा पसरवल्यास कारवाई

लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये

निवडणुकीत विमानं, हेलिकॉप्टर मधूनयेणाऱ्या साहित्यांवर नजर

राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना नियमांची माहिती द्यावी

चिथावणीखोर भाषणांवर बंदी

उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर त्याची माहिती त्यांना वृत्तपत्रातून द्यावी लागेल

12 राज्यांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त

2100 निरीक्षक नियुक्त

(अपडेट पाहण्यासाठी जुळून रहा लोकशाहीशी )

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.