सुरुवात असते तिथे समाप्ती येणारच!

0

 

[] प्रवचन सारांश 7/11/2022 []

 

आदी असते त्याचा अंत आवश्यक आहे. जिथे सुरुवात असते तिथे समाप्ती ओघाने येणारच. सुरुवात, मध्य व समाप्ती या स्थितीतून जीवनात जावे लागते. हा तर विदाई समारंभच नव्हे तर बधाई किंवा अभिनंदन समारोप म्हणायला हवा. असे पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनात सांगितले.
आदी, मध्य आणि अंतिम असे टप्पे प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात येत असतात. आदी म्हणजे जन्म, अंत म्हणजे मृत्यू होय. खरे तर जीवनाचा अंतिम पाडाव सुखद व्हायला हवा. जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे या संधीचे प्रत्येकाने सोने करावे असे आवाहन पू. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले. पू. डॉ. पदमचंद्र महाराज साहेब यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांचे ‘मेरी भावना’ तर पू. जयपुरंधर म.सा. यांचे ‘आगम शास्त्र’ विषयक गत चार महिने प्रवचन माला ऐकण्याची संधी श्रावक-श्राविकांना मिळाली.
जळगाव येथील आर. सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आशुकवि आचार्य श्री. पार्श्वचंद्र जी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. ७ नोव्हेंबर रोजी प.पू. जैन साधू व समणीजी यांचा विदाई समारंभ झाला. यावेळी श्रावक- श्राविकांनी गाणे, सादरीकरण आणि भाषणाच्या माध्यमातून आपले अनुभव कथन केले.

जीवन जगताना छोटे पाप करावे लागतात असे गृहित धरून इतके तर चालतेच असे म्हटले जाते. या बाबतीत देखील गहन चिंतन करणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयी एक मानसोपचार तज्ज्ञ व दोन युवकांची गोष्ट दाखल्याकरिता सांगितली. छोटे पाप करणारा युवक व मोठे पाप करणारा युवक आपले मन हलके करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाला भेटले. मोठे पाप करणाऱ्याला मोठे दगड तर लहान पाप करणाऱ्याला छोटे दगड गोळा करायला सांगितले. छोटया पापाची संख्या खूप जास्ती ठरली. आपण परिवारासाठी करतो असे म्हणून चालणार नाही ज्याने कर्म केलेले आहे त्याचे फळ ते कर्म करणाऱ्यालाच भोगावे लागतात. मनाद्वारे केलेले पाप देखील पापच असते हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे. याबाबत अत्यंत उद्बोधक प्रवचन करण्यात आले. यावेळी जेपीपी महिला फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी चातुर्मास आरंभ ते समारोप दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले. 8 नोव्हेंबर रोजी चातुर्मास व प्रवचनाचा समारोप होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी एकभवावतारी पू. श्री जयमतजी म.सा. यांचा दीक्षा स्मृति समारोह जळगाव येथील आदिनाथ सोसायटी येथे होणार आहे. त्याबाबतची विनंती अनिलभाई पगारीय, आदेशभाई ललवाणी, उल्हास जैन यांनी केली होती. त्यास पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी मान्यता दिली.

 

——□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.