Live ː महाराष्ट्रात कोणता उमेदवार आघाडीवर, कोण पिछाडीवर.. जाणून घ्या एका क्लिकवर

0

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार असून त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचे काही उमेदवारही काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्यााची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बऱ्याच एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. आता खरा निकाल काय लागतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील ४८ मतदार संघात काय स्थिती आहे याची माहिती तुम्हााला इथे बघायला मिळेल.

Live Update

# ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत: शरद पवार

लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाच भूत असून यापूर्वी नरसिंहराव, राजीव गांधी यांचा देखील भरघोस मताधिक्याने विजय झाला होता, पण त्यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या नव्हत्या.  पण यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होत आहेत: शरद पवार

# जनतेचा कौल आमची झोप उडवणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेचा कौल आमची झोप उडवणारा असून आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जे प्रयत्न करत होतो ते आता वाढवणं गरजेचं असून, जनतेसाठी जास्त मेहनत करावी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

# भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आघाडीवर, काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह दुसऱ्या स्थानी

# पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर

# पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सनी देओल २ लाख ८०६२३ मते घेऊन आघाडीवर, काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड पिछाडीवर

# धुळे : भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना एक लाखाहून जास्त मताधिक्य, काँग्रेस उमेदवार कुणाल रोहिदास पाटील पराभवाच्या छायेत

# दिंडोरीतून भाजपच्या भारती पवार आघाडीवर, धनराज महाले 30 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर

# काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवलं, गोपाळ शेट्टींचा आरोप, संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिलांचा बळी दिला, पण फटका दोघांना बसेल, शेट्टींना विश्वास, माझी लढाई उर्मिला यांच्याशी नाही तर काँग्रेसशी असल्याचंही उत्तर

# मावळमधून श्रीरंग बारणे यांची मोठी आघाडी, पार्थ पवार एक लाखाहून अधिक मतांनी पिछाडीवर

# अकोला- भाजपचे संजय धोत्रे 35,844 मतांनी आघाडीवर, प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर

# नंदुरबार :- महाराष्ट्र नंदुरबार येथील कॉंग्रेसची एकमेव जागा के.सी.पाडवी यांची आघाडीवर होती. परंतु पाडवीसुद्धा पिछाडीवर पडले असून भाजपच्या हिना गावित यांनी आघाडी घेतली आहे.

# भाजप-शिवसेना महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा निश्चित, गिरीश महाजन यांना विश्वास

# मुंबईत शिवसेनेचे सर्व उमेदवार आघाडीवर, राज्यात आतापर्यंत सेना १९ ठिकाणी आघाडीवर

# महाआघाडीची विभागनिहाय आघाडी मुंबई – 0/6 कोकण-ठाणे – 1/6 मराठवाडा – 0/8 विदर्भ – 0/10 पश्चिम महाराष्ट्र – 3/10 उत्तर महाराष्ट्र – 3/8

# मावळ मध्ये पवारांना धक्का, पार्थ पवार तब्बल ४४ हजार मतांनी पिछाडीवर

# मतमोजणी पहिली फेरी उत्तर मुंबई – एनडीए आघाडीवर भाजप – गोपाळ शेट्टी २६ हजार मतांनी आघाडीवर काँग्रेस – उर्मिला मातोंडकर

# औरंगाबाद मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील ९ हजार मतांनी आघाडीवर

# भाजपचा विजयरथ २०१४ पेक्षा जोरात

# बीडमध्ये प्रीतम मुंडे ९ हजार मतांनी आघाडीवर

# रामटेकमध्ये शिवसेनेचे तुमाने ४ हजार मतांनी पुढे

# शिरुरमधून अमोल कोल्हे 36 हजार 442, तर शिवाजीराव आढळराव पाटील 16 हजार मतांनी आघाडीवर

# औरंगाबादेत चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर, इम्तियाल जलील चार हजार मतांनी पुढे

# रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर

# हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पहिल्या फेरीअखेर 46 मतांनी आघाडीवर

# सुप्रिया सुळे 8 हजार मतांनी पिछाडीवर

# बारामतीमध्ये कांचन कूल आघाडीवर, सुप्रिया सुळेंना पहिल्या फेरीत कडवी टक्कर

सुप्रिया सुळे – १० हजार ५९८

कांचन कूल – १५ हजार २७८

# नाशिकमधून हेमंत गोडसे पुढे, तर समीर भुजबळ मागे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर,

#पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीष बापट आघाडीवर

# नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर

# श्रीरंग बारणेंना मागे टाकत पार्थ पवार मतमोजणीत पुढे

श्रीरंग बारणे – ९१६८

पार्थ पवार – १०,३४१

#उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी आघाडीवर, उर्मिला मातोंडकरला पिछाडी

चिन्ह पक्ष आघाडी/विजयी
भाजप+शिवसेना 41
काँग्रेस +राष्ट्रवादी 6
वंचित बहुजन आघाडी0 1
अपक्ष/इतर 0
एकूण 48/48

Leave A Reply

Your email address will not be published.