कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड

0

जळगाव :- जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरवात झाली. स्ट्रोग रूम बरोबर ८ वाजता उघडण्यात आले. याप्रसंगी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तर यंदाच्या मतमोजणीचे वैशिट्ये म्हणजे विधानसभा निहाय मतपेट्या आणनल्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असून मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल दिसल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुरवातीला पोस्टल मतमोजणीला प्रारंभ झाला. त्यानंतर विधानसभा निहाय मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीची आकडेवारी लवकरच समोर येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.