Live ː रक्षा खडसे 331856 तर उन्मेष पाटील 408973 मतांनी पुढे

0

जळगाव | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीला आज प्रारंभ झाला हि मतमोजणी एमआयडीसी मधील राज्य वखार महामंडळाच गोदामात होत आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या टपाली  मतमोजणीससुरवात झाली आहे. यात जळगावात एकुण 14 तर रावेर लोकसभा मतदार संघातील 12 उमेदवारांचा फैसला होईल. जळगावात भाजपचे उन्मेष भय्यासाहेब पाटील, तर राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, तसेच रावेर लोकसभा मतदार संघातील डॉ.उल्हास वासुदेव पाटील, रक्षा खडसे यांच्यातील चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. निकालासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  मतमोजणीस सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालीआहे. तर पोलीस बंदोबस्तही मोठ्या स्वरुपात लावण्यात आला आहे. विधानसभा निहाय मतमोजणी होणार असून त्यासाठी 208 टेबल लावण्यात आले. मतमोजणीसाठी 1996 कर्मचारी कार्यरत आहेत. जळगावसाठी 56.12 तर रावेर मतदार संघासाठी 61.40 टक्के  23 एप्रिल रोजी मतदान झालेले आहे. जळगावकरिता सरासरी 24, तर रावेरसाठी सरासरी 23 फेर्‍या होतील. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.
 LIVE UPDATE

भाजपचे उमेदवार आघाडीवर 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील 408973 मतांनी पुढे, तर रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार  रक्षा खडसे 331856 मताधिक्यांनी आघाडीवर आहे.

# भाजपमध्ये आनंदाचे वातावरण

जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने मतमोजणीच्या ठिकाणी भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. मोदीचं पंतप्रधान होणार असल्याचे भाजपचे नेते व कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

#पोस्टल मतामध्ये देशात भाजप शतकाकडे आघाडीची वाटचाल केली असून कॉंग्रेस आघाडी अर्धशतक गाठले आहे. नांदेड अशोक चव्हाण १००० मतांनी पोस्टलमध्ये आघाडी घेतली आहे. हातकलंगलेमध्ये स्वभिमानीचे राजू शेट्टी पिछ्याडीवर आहे.

#रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे तर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील आघाडीवर आहे. १५ मिनिटात आकडेवारी हाती येईल.

#रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन फेऱ्यांचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीनंतर काँग्रेसला १५१३१ मते तर भाजपाला २५३६८ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत काँग्रेसला १३७८२ मते तर भाजपला २४९१८ मते मिळाली आहे. दोघी फेऱ्यात रक्षा खडसे सुमारे २०००० मताने आघाडी घेतली आहे.

# रावेर मतदारसंघात २४ फेऱ्या पूर्ण रक्षा खडसे ३२७१९६ मतांनी पुढे आहेत. तर पोस्टल मतमोजणी सुरु आहे.

#२२ व्य फेरीत भाजपचे उन्मेष पाटील यांना ६४१८८३, तर राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना २७३६९४, मते मिळाली. याफेरीत उन्मेष पाटील ३६८१८९ मतांनी पुढे आहे. जळगाव मतदारसंघातील मतमोजणी अजून दोन फेऱ्यांमध्ये होईल. तर टपाली मतमोजणीस सुरवात होत आहे. रावेर मतदारसंघातील २४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहे. तर टपाली मतदानाची मतमोजणी अंतिम टप्यात आहे.

महाराष्ट्राचा निकाल

चिन्ह पक्ष आघाडी/विजयी
भाजप+शिवसेना 41
काँग्रेस+राष्ट्रवादी 06
वंचित बहुजन आघाडी 0
अपक्ष/इतर 1
एकूण 48/48

जळगावचा निकाल 

चिन्ह पक्ष आघाडी/विजयी
उन्मेष पाटील 
भाजप+शिवसेना
707224
गुलाबराव देवकर
काँग्रेस + राष्ट्रवादी
298251
अंजली बाविस्कर 
वंचित बहुजन आघाडी
37148

रावेरचा निकाल

चिन्ह पक्ष आघाडी/विजयी
रक्षा खडसे 
भाजप+शिवसेना
649885
डॉ. उल्हास पाटील
काँग्रेस +राष्ट्रवादी
318029
नितीन कांडेलकर
वंचित बहुजन आघाडी
87799

 

 

 

 

ली बाविस्कर वंचित बहुजन आघाडी

Leave A Reply

Your email address will not be published.