बिबट्या घरात घुसला; आणि कहर केला…(व्हिडीओ)

0

 

गुरूग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जंगलाच्या आसपास असलेल्या भागात आणि घरांमध्ये बिबट्या दिसणे सामान्य आहे. गुरुग्राममध्ये बिबट्या दिसल्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. गुरुग्रामच्या नरसिंगपूर गावात बिबट्याने कहर केला. बुधवारी सकाळी गुरुग्राममधील एका घरात बिबट्या घुसला आणि तेथून बाहेर आला नाही. अचानक बिबट्या घरात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत गुरुग्राम पोलीस आणि वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच संपूर्ण टीम दाखल झाली आणि घराबाहेर मोठ्या जाळ्या व आवश्यक वस्तू घेऊन बिबट्याला पकडण्यास सुरुवात केली. एएनआयने X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, बिबट्या पायऱ्यांवरून थेट घरात कसा पळतो ते तुम्ही पाहू शकता.

एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या घराच्या अंगणात आणि पायऱ्यांमध्ये उडी मारताना दिसत आहे. अनेकजण व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. अशा प्रकारे बिबट्या घरात घुसणे अत्यंत धोकादायक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.