अट्टल चोरट्याकडून चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क 

अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक केली असून जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह १४ दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजय अंबालाल पावरा (वय-२७) रा. वकवड ता. शिरसोली जि.धुळे असे ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाण दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लोकेश माळी, अशोक पाटील यांनी कारवाई करत रविवारी १९ मार्च रोजी अमळनेर शहरातून संशयित आरोपी अजय अंबालाल पावरा रा. वकवड ता. शिरपूर जि. धुळे याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकूण चोरीच्या १४ दुचाकी काढून दिल्या. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.