सर्दी-खोकल्यासाठी ‘लवंग’ आहे फायदेशीर, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिवाळा सुरु झाला की लोकांना सर्दी आणि खोकल्याचा सर्वाधिक त्रास होतो. सर्दी, लाफ, आणि खोकल्यामुळे लोक त्रस्त होतात. अनेकवेळा यातून लवकर आराम मिळत नाही. अशा वेळेस काही घरगुती उपाय करणे गरजेचं आहे. खोकला बारा होत मासेल तर, अनेक प्रभावी उपाय आहे. कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लवंगचा वापर करू शकतात. लवंग मधात मिसळून खाल्ल्यास आणि ओल्या खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.

मध आणि लवंग हे उत्तम उपाय आहे. साधारण ७-८ लवंग घ्या आणि गरम तव्यावर हलक्या हाताने भाजून घ्या. लवंग थंड झाल्यावर बारीक पावडर करून, त्यात ३-४ चमचे मध घाला. थोडे गरम करून ते सकाळी, संध्याकाळी, आणि दुपारी प्रेत्येकी एक चमचा सेवन करा. यामुळे खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. फक्त २-३ दिवस खाल्ल्याने तुम्हाला फरक दिसू लागेल. यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका.

 

लवंग खाण्याचे फायदे

  • लवंगमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होते.
  • सांधेदुखीमध्ये लवंग फायदेशीर आहे.
  • लवंगमध्ये युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, फ्री रॅडिकल्स, हृदय, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते.
  • लवंग पोटातील अल्सर कमी करते आणि पोटाच्या आवरणाचे रक्षण करते.
  • लवंग पोटफुगी, गॅस, आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
  • लवंगात अनेक एंजाइम असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.