मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले लातूरसह ‘या’ शहरात, वाचा सविस्तर

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनासाठी आंदोलकांवर पोलिसांनी शक्रवारी लाठी हल्ला केल्याचा लातूर जिल्ह्यात विविध भागांत समाजबांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला. रेणापूर, औसा, या ठिकाणी याचे पडसाद उमटून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

लातूर शहरात शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी मांजराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात अली.. दुचाकी रॅली काढून शहराच्या विविध भागांत बंदचे आवाहन करण्यात आले. याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवसभर दुकाने बंद ठेवली. तसेच रेणापूर येथे पिपळफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी सध्या आंदोलक देत आहे.

लातूर शहरात बाजारपेठ बंद…
लातूर शहरात देखील याचे पडसाद उमटले असून, लातूर शहरासह जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील बाजारपेठ, आडत बाजार बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सर्वत्र उलाढाल ठप्प पडली होती. शिवाय, लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या अनेक बसेफेऱ्याही महामंडळ प्रशासनाने रद्द केल्या. परिणामी, लातूर येथील आगारात शेकडाे बसेच जाग्यावरच थांबल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.