लसणाच्या किंमतीत वाढ, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर पुन्हा वाढला आहे. लसणाच्या दराने ४०० रुपये किलीपर्यंत मजल मारली आहे. बाजारात दिवसेंदिवस लसणाच्या दरात वाढ होऊ लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.

उद्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नेहमी ८० ते १०० रुपये किलो असणारा लसणाचा भाव हा ४०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झाल्याने उद्पादनात मोठी घाट झाली आहे. अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.

दरम्यान मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने लसणाच्या भावात वाढ झाली आहे असेही सांगण्यात येत आहे. नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.